वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल मोडणार धोनीचा विक्रम, इतकं केलं की झालं…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यात केएल राहुलकडे मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. 3 धावा करताच महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडणार आहे.

| Updated on: Oct 09, 2025 | 8:59 PM
1 / 5
भारत वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. त्यामुळे ही मालिका 2-0 ने जिंकण्याची संधी आहे. आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलने जबरदस्त खेळी केली होती. त्याने शतकी खेळी करत टीम इंडियाला सुरुवातीपासून मजबूत स्थितीत आणलं होतं. आता अशाच कामगिरीची त्याच्याकडून दुसर्‍या सामन्यातही अपेक्षा आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध 400 धावांचा पल्ला गाठला आहे. तसेच एमएस धोनीचा विक्रम मोडण्यासाठी फक्त तीन धावांची आवश्यकता आहे.वेस्ट इंडिजविरुद्ध तीन धावा करताच केएल राहुल वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध 8 सामन्यात 11 डावात 474 धावा केल्या आहेत. तर एमएस धोनीने 12 कसोटी सामन्यांच्या 19 डावात 476 धावा केल्या आहेत. महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडण्यासाठी केएल राहुलला 3 धावांची गरज आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 2749 धावा केल्या आहे. यात 13 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. राहुल द्रविडनेने 1978 आणि व्हिव्हिएस लक्ष्मणने 1715 धावा केल्यात.(Photo: Murrell/Allsport/Hulton Archive/Getty Images)