
फुटबॉल स्टार लियोनल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली आहे. काही ना त्याला पाहता आलं तर काहींच्या पदरी निराशा पडली आहे. मेस्सीची क्रेझ भारतातही आहे. पण हा दिग्गज क्रिकेटपटू बालपणीची मैत्रीण अँटोनेला रोकुझोच्या प्रेमात वेडा आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

फुटबॉल स्टार आणि रोकुझोची भेट लहानपणी झाली होती. त्यानंतर मेस्सी फुटबॉलच्या प्रशिक्षणासाठी दूर गेला. पण या दुराव्यातही त्यांचं प्रेम कायम राहिलं. ते पुन्हा एकत्र आले आणि लग्न केलं. लियोनल मेस्सीने 2017 मध्ये बालपणीची मैत्रीण अँटोनेला रोकुझोशी लग्न केले. या जोडप्याला तीन मुलं आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)

मेस्सीने त्याच्या पत्नीचं कौतुक करताना सांगितलं होतं की, "माझी पत्नी अँटोनेला हिच्यात खूप चांगले गुण आहेत. ती दैनंदिन जीवन कसे हाताळते याचे मला खरोखर कौतुक वाटते, ती नेहमीच चांगल्या मूडमध्ये असते आणि ती समस्या खूप चांगल्या प्रकारे हाताळते. ती खूप हुशार आहे आणि जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये चांगली आहे." (फोटो- इन्स्टाग्राम)

18 डिसेंबर 2022 रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फायनल होती. पण 13 डिसेंबर 2022 रोजी तिने मेस्सी आणि अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या विश्वचषक फायनलचा आनंद एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे साजरा केला होता. तिचं हे स्वप्न सत्यात उतरलं आणि पेनल्टी कॉर्नरमध्ये अर्जेंटिनाने 4-2 ने मात दिली आणि विजय मिळवला. (फोटो- इन्स्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अँटोनेलाची एकूण संपत्ती १६५ कोटींपेक्षा जास्त आहे. अँटोनेला फिटनेस ब्रँडसाठी मॉडेलिंग देखील करते. यातून ती चांगली कमाई करते. अँटोनेला ट्विटर आणि फेसबुकवर नाही. पण इंस्टाग्रामवर असून तिचे 35 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)