रचीन रवींद्र याने संधी न मिळाल्याने केकेआरची सोबत सोडली? कारण समजून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेतून कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता फक्त काही सामन्यांची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. असं असताना संघातील एक खेळाडू साथ सोडून आपल्या घरी परतला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने सुरुवातीचे काही सामने गमवून जबरदस्त कमबॅक केलं होतं. पण एक पराभव झाला आणि स्पर्धेतील स्थान डळमळीत झालं. यानंतर अष्टपैलू रचिन रवींद्र अचानक आयपीएल 2026 स्पर्धा सोडून गेला. रचिन रवींद्रला या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने एकही संधी दिली नाही. आता रचिन रवींद्र स्पर्धा सोडून न्यूझीलंडला गेला आहे. (Photo: PTI)

कोलकाता नाईट रायडर्सने शुक्रवारी स्पष्ट केलं की, रचिन रवींद्र कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मायदेशी परतला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी रचिन रवींद्रने हा निर्णय घेतला. केकेआरने रचिन रवींद्रला 2 कोटींच्या बेस प्राईसवर घेतलं होतं. (Photo: PTI)

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा संघ 27 मे रोजी बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध चार दिवशी सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. या मालिकेतील पहिला सामना 4 जूनला लॉर्ड्स मैदानावर असेल. (Photo: PTI)

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना द ओव्हल मैदानात 17 जून ते 21 जून दरम्यान होईल. तर नॉटिंघममध्ये 25 जून ते 29 जून दरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जाईल. न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: PTI)

कसोटी क्रिकेटमध्ये रचिन रवींद्रने जबरदस्त कमगिरी केली आहे. रवींद्रने ऑगस्ट 2025 मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध नाबाद 165 धावांची खेळी केली होती. यानंतर क्राइस्टचर्चमध्ये 176 धावा आणि डिसेंबरमध्ये माउंट माउंगानुईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 72 धावांची खेळी केली होती. (Photo: PTI)