IND vs SL : दुसऱ्या कसोटीपूर्वी पार पडलेल्या सराव शिबिरात काय झालं? कुलदीप यादवची संधी गेली!
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोलंबोत होणार आहे. 23 ऑगस्टपासून या सामन्याला सुरूवात होणार आहे. असं असताना या सामन्यातून कुलदीप यादवला डावललं जाण्याची शक्यता वाढली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव काही खास करू शकला नाही. दोन्ही डावात मिळून फक्त एकच विकेट मिळाली होती. त्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात त्याच्या सारांश जैनला संधी मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या डोक्यात फिरत आहे. (PC-PTI)

कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण सराव शिबिरात तसंच चित्र पाहायला मिळालं. कारण सारांश जैनने कोलंबोत जोरदार सराव केला. रिपोर्टनुसार, नेट सरावात सर्वांचं लक्ष सारांश जैनकडेच होतं. (PC-PTI)

भारताची फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुलेने सारांश जैनवर फोकस केला. सारांश जैनने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली आहे. मागच्या पर्वात त्याने 30 विकेट काढल्या होत्या. (PC-PTI)

साईराज बहुतुले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, श्रीलंकेत कूकाबूरा चेंडूचा वापर होतो. हा चेंडू फिंगर स्पिनर्सला नियंत्रित करणं सोपं असतं. पण रिस्ट गोलंदाजाला कठीण जातं. सारांश जैन फिंगर स्पिनर आहे आणि कोलंबोत चांगली कामगिरी करू शकतो हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं. (PC-PTI)

कुलदीप यादवने आतापर्यंत 19 कसोटी सामन्यात 80 विकेट घेतल्या आहेत. यात 61 विकेट या एसजी चेंडूवर घेतल्या आहेत. तर ड्यूक चेंडूवर त्याच्या खात्यात एकही कसोटी विकेट नाही. (PC-PTI)