IPL 2026 : आणखी काय हवंय एका पित्याला! पोराने नाव काढलं, Lsg कडून पदार्पण, 8 पट भाव मिळालेला मुकुल चौधरी कोण?

Mukul Choudhary LSG vs DC ipl 2026 : बॅटिंग, बॉलिंग आणि विकेटकीपर अशा तिन्ही भूमिकांमध्ये माहिर असलेल्या 21 वर्षीय मुकुल चौधरी याच्यासाठी 1 एप्रिल अविस्मरणीय ठरला आहे. मुकुलचं लखनौकडून आयपीएल पदार्पण झालं आहे.

| Updated on: Apr 01, 2026 | 8:48 PM
1 / 5
लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील आपल्या पहिल्या समान्यात 21 वर्षीय अनकॅप्ड मुकुल चौधरी याला संधी दिली आहे. लखनौने मुकुलसाठी कोटी रुपये खर्चून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.  (Photo Credit : Instagram /Mukul Choudhary)

2 / 5
मुकुल विकेटकीपर बॅट्समन आहे. मुकलची 30 लाख रुपये बेस प्राईज होती. मात्र मुकुलसाठी लखनौने 8 पट जास्त पैसे मोजले. मुकुलला लखनौकडून 2 कोटी 60 लाख रुपये इतका भाव मिळाला. मुकुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानचं प्रतिनिधित्व करतो. (Photo Credit : Instagram /Mukul Choudhary)

3 / 5
मुकुल राजस्थानमधील झुनझुन जिल्ह्यातील गुडागोडजी गावातील आहे. मुकुलने सीकरमधील एबीएस अ‍ॅकडमीमध्ये क्रिकेटचे धडे घेतले. मुकुल विकेटकीपिंग आणि बॅटिंगसह वेगवान गोलंदाजी करण्यात माहीर आहे. (Photo Credit : Instagram /Mukul Choudhary)

4 / 5
माझं क्रिकेटर होण्याचंच एकमेव लक्ष्य होतं, असं मुकुलने एका मुलाखतीत म्हटलं होतं. आता क्रिकेटर झाल्याशिवाय परतायचं नाही, असं मुकुलला त्याचे वडील गाव सोडताना म्हणाले होते.  मुकुलने आता त्याच्या वडिलांचं हे स्वप्न पूर्ण केलं. (Photo Credit : Instagram /Mukul Choudhary)

5 / 5
मुकुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये 4 फर्स्ट क्लास, 5 लिस्ट ए आणि 7 टी 20 सामने खेळला आहे. मुकुलने या 7 टी 20i सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 210 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Instagram /Mukul Choudhary)

Follow Us