
आयपीएल 2025 स्पर्धेतील 61 सामन्यांचा खेळ संपला आहे. या स्पर्धेतील फक्त 9 सामन्यांचा खेळ उरला आहे. मात्र या नऊ सामन्यापूर्वी प्लेऑफमधील चौथा संघ ठरणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाची लढत होणार आहे. या सामन्यानंतर प्लेऑफचा चौथा संघ ठरणार आहे. (Photo- BCCI/IPL)

मुंबई इंडियन्सचे गुणतालिकेत 14 गुण आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सचे 13 गुण आहेत. दोन्ही संघांचे शेवटचे दोन सामने शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सने हे दोन्ही सामने जिंकले तर 18 गुण होतील आणि प्लेऑफचं स्थान पक्कं होईल. तर दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले तर 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. (Photo- BCCI/IPL)

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 21 मे रोजी एकमेकांसमोर येतील. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला तर थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. (Photo- BCCI/IPL)

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला तर प्लेऑफची आशा जिवंत राहतील. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवला तर एकूण 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. (Photo- BCCI/IPL)

दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामने जिंकले आणि पंजाब किंग्सविरुद्ध हरले तरीही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. पण पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला शेवटच्या सामन्यात पराभूत करणं गरजेचं आहे. यामुळे 15 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान पक्कं होईल. (Photo- BCCI/IPL)

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं तरी प्लेऑफच्या संधीची अपेक्षा करू शकतात. यासाठी दिल्ली कॅपिटल्सना पंजाब किंग्सकडून पराभूत व्हावे लागेल. दरम्यान, पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवून मुंबई इंडियन्स 16 गुणांसह पुढील टप्प्यात पोहोचू शकते. (Photo- BCCI/IPL)