मुंबई इंडियन्सने 50 हजार धावा करून रचला इतिहास, आरसीबी आणि सीएसकेची काय स्थिती? जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण असं असलं तरी एक विक्रम नावावर केला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभवाचं तोंड पाहिलं आणि 50 धावा करणारी पहिली फ्रेंचायझी ठरली.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 44 सामन्यांचा खेळ संपला असून आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणाऱ्या संघाची नाव पुढे येण्यास सुरूवात झाली आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक असून प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण आहे. त्यामुळे या पर्वात पदरी निराशा पडली आहे. (Photo: BCCI/IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा पराभूत केलं. चेपॉक स्टेडियममध्ये खेळलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 8 विकेटने मात दिली. यासह या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने 9 पैकी सातवा सामना गमावला. (Photo: BCCI/IPL)

मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरू आहेत. विजय मिळेल या आशेने प्रत्येक सामन्यात चाहते येतात. पण पराभूत होत असल्याने निराश व्हावं लागत आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामनाही मुंबई इंडियन्सने गमावला. पण या सामन्यात एक विक्रम रचला. या सामन्यात आपल्यात 114वी धाव घेताच मुंबई इंडियन्सने टी20 क्रिकेटमध्ये 50 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo: BCCI/IPL)

मुंबई इंडियन्सने 308 व्या टी20 सामन्यात ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. या यादीत मुंबई इंडियन्सनंतर इंग्लंडची देशांतर्गत टीम समरसेटचा नंबर लागतो. या संघाने 48,244 धावा केल्या आहेत. (Photo: BCCI/IPL)

तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नंबर लागतो. या संघाने 295 सामन्यात 47304 धावा केल्या आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स चौथ्या क्रमांकावर असून 286 सामन्यात 46598 धावा केल्या आहेत. (Photo: BCCI/IPL)