IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास, काय केलं ते वाचा
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 45व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 215 धावा केल्या. तसेच लखनौ सुपर जायंट्सला 161 धावांवर रोखलं. या विजयासह गुणातालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर एक विक्रम नावावर केला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 45व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागले.

मुंबई इंडियन्सनने प्रथम प्रथम फलंदाजी करत सलामीवीर फलंदाज रायन रिकेलटन (58) आणि मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 54 धावा केल्या. यासह मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 215 धावा केल्या.

लखनौ सुपरजायंट्सने 10 षटकांत 100 धावांचा टप्पा गाठला होता. पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली आणि धडाधड विकेट पडल्या. लखनौ सुपर जायंट्सचा डाव 161 धावांवर आटोपला. यासह मुंबई इंडियन्सने 54 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात 150 सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबईने आतापर्यंत आयपीएलमध्ये 271 सामने खेळले आहेत. त्यापैकी 150 सामने जिंकले आहेत तर 119 सामने गमावले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 248 सामने खेळले आहेत. त्यापैकी 140 सामने जिंकले आहेत. तर 105 सामने गमावले आहेत.

या यादीत कोलकाता नाईट रायडर्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. केकेआरने आतापर्यंत 261 सामने खेळले आहेत, त्यापैकी 134 जिंकले आहेत तर 122 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने आतापर्यंत 266 सामने खेळले आहेत. त्यापैकी 129 सामने जिंकले आहेत तर 131 सामने गमावले आहेत. (सर्व फोटो- BCCI/ IPL)