AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS Mohan Bhagwat : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक

RSS Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आजपासून संघ परिवाराची महत्वाची बैठक होणार आहे. मंगळवारी विज्ञान विहार येथे आयोजित प्रेस ब्रीफिंग मध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली.

RSS Mohan Bhagwat : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक
Rss Leaders
| Updated on: Aug 19, 2026 | 8:34 AM
Share

विशाखापट्टणम जवळ असलेल्या गुडिलोवा ‘विज्ञान विहार’ विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्वय बैठक’होणार आहे. 19 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते 21 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत या बैठकींचं सत्र चालणार आहे. मंगळवारी विज्ञान विहार येथे आयोजित प्रेस ब्रीफिंग मध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी अखिल भारतीय समन्वय बैठक आोयजित करण्यात येते. यात संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या एकूण 32 संघटनाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सह सरकार्यवाह आणि अन्य केंद्रीय अधिकारी उपस्थित राहतील. समन्वय बैठकीत संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या भारतीय मजदूर संघ, विश्व हिन्दू परिषद, भारतीय जनता पार्टी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, राष्ट्र सेविका समितीसह अन्य राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री, अखिल भारतीय संघटन मंत्री आणि काही निवडक कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होतील. विविध संघटनांच्या 49 महिलांसह एकूण 253 प्रमुख कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी मिळून एकूण 327 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

कुठले निर्णय घेणारी ही बैठक नसल्याचं सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केलं. समाजिक हितासाठी कार्यरत असणाऱ्या विभिन्न संघटनांमध्ये समन्वय, त्यांचे अनूभव जाणून घेणं, परस्पर समन्वय सुधारणा यावर चर्चा होईल. देशाची वर्तमान स्थिती, सामाजिक परिवर्तन आणि समस्यांचं निराकरण कसं करता येईल यावर मंथन होईल. लोकसंख्याविषयक असंतुलन डेमोग्राफिक बदलाचे परिणाम यावर बैठकीत चर्चा होईल. युवकांना व्यसन मुक्तीपासून दूर ठेवण्यासाठी काय उपायोजना करता येतील, यावर सुद्धा चर्चा होईल. नशा मुक्तीसह युवकांध्ये जनजागृती यावर मंथन होईल.

या विषयांना कसं पुढे न्यायाचं

संघाच्या शताब्दी वर्षावेळी ‘पंच परिवर्तन’ ठरवण्यात आलेलं, त्यावरही चर्चा होईल. सामाजिक समरसता, पर्यावरण अनुकूल जीवनशैली, कुटुंब प्रबोधन (कौटुंबिक मूल्य), ‘स्व’ का भाव (स्वदेशी / स्व-जागरण), नागरिक कर्तव्यांचे पालन या विषयांवर चर्चा होईल. संघाचे स्वयंसेवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पंच परिवर्तन प्रयत्न आरंभ केले आहेत. शताब्दी वर्ष पूर्ण झाल्यानंतर या विषयांना कसं पुढे न्यायाचं आहे, तसचं विविध संघटनांच्या भूमिकांवर चर्चा होईल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात