IPL 2026: मुस्तफिजुर रहमानवर बंदी? नेमकं काय घडलं की उडाला गोंधळ

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आता दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी संघांची बांधणी झाली आहे. पण आता आयपीएल 2026 स्पर्धेत बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानच्या खेळण्यावरून गोंधळ उडाला आहे.

| Updated on: Dec 31, 2025 | 9:28 PM
1 / 5
आयपीएल 2026 मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानवर 9.2 कोटींची बोली लावली. यासह मुस्तफिजुर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा बांगलादेशी गोलंदाज ठरला. इतकंच काय तर सलग पाच पर्व खेळणारा एकमेव बांगलादेशी गोलंदाज आहे.  (फोटो- Tanvin Tamim/DRIK/Getty Images)

2 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी सुरु असताना सोशल मीडियावर मात्र मुस्तफिजुर रहमान विरूद्ध रान उठलं आहे. केकेआरच्या चाहत्यांनी आणि क्रीडारसिकांनी टीकेची झोड उठवली आहे. दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संतापाची लाट उसळली आहे. असं असताना मुस्तफिजुर रहमानच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (फोटो-PTI )

3 / 5
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता आणि हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारत सरकारच्या सूचनांनुसार, बीसीसीआयने टीम इंडियाचा बांगलादेश दौराही पुढे ढकलला. इतकंच काय तर आयपीएलच्या मागच्या पर्वात बांगलादेशी खेळाडूंना दुर्लक्षित करण्यात आलं होतं. (फोटो-PTI )

4 / 5
मुस्तफिजूरच्या केकेआरमधील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की बांगलादेशी खेळाडूंवर कोणतीही बंदी घातली जाणार नाही. दरम्यान मुस्तफिजूर रहमानने आयपीएलमध्ये दिल्ली, चेन्नई, राजस्थान रॉयल्स, मुंबई आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. (Photo: AFP)

5 / 5
इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आपण हे समजून घेतले पाहिजे की ही एक नाजूक परिस्थिती आहे. आम्ही  परिस्थितीबाबत सरकारशी सतत संपर्कात आहोत आणि आम्हाला अशा काहीच सूचना मिळालेल्या नाही. त्यामुळे आम्हाला बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालावी लागेल. त्यामुळे मुस्तफिजूर आयपीएलमध्ये खेळेल." (फोटो-PTI )