मुस्तफिझुर रहमानला मिळणार नव्या संघात एन्ट्री, आयपीएलमधून आऊट होताच ऑफर

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला संघातून आऊट केलं आहे. त्यामुळे बराच वाद सुरू आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळण्यास नकार दिला आहे. असं असताना मुस्तफिझुर रहमानला नव्या संघात एन्ट्री मिळाली आहे.

| Updated on: Jan 06, 2026 | 10:08 PM
1 / 5
बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल 2026 स्पर्धेतून काढलं आहे. मुस्तफिजुर रहमानला आयपीएल 2026 च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली होती. भारत-बांगलादेश संबंधांमधील ताणानंतर त्याला वगळण्यात आले. बीसीसीआयने आदेश दिल्यानंतर केकेआरने त्याला संघातून काढलं. (Photo- PTI)

2 / 5
मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सने 9.2 कोटीत विकत घेतले. केकेआर, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी मुस्तफिझुरसाठी बोली लावली होती. केकेआरने सर्वाधिक रक्कम मोजत त्याला संघात घेतलं. पण त्याला संघात घेतल्याने केकेआर संघ गेल्या काही दिवसात टीकेचा धनी ठरला होता. Photo: PTI)

3 / 5
मुस्तफिझुर रहमान आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसेल. त्याने पीएसएलसाठी नोंदणी केली आहे. पाकिस्तान सुपर लीगचा लिलाव होणार आहे . आता त्याच्यासाठी किती बोली लागते आणि कोणत्या संघात सहभागी होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo: PTI)

4 / 5
इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला वगळण्याबाबत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलशीही सल्लामसलत केली नाही. हा निर्णय बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला होता आणि आयपीएल अधिकाऱ्यांना माध्यमांद्वारे याची माहिती मिळाली. (फोटो- टीव्ही 9 मल्यालमवरून)

5 / 5
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये मोठा वादाची ठिणगी पडली आहे. बीसीबीने टी20 विश्वचषकासाठी बांगलादेश संघ भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. आयसीसीला टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली आहे.(फोटो- टीव्ही 9 बांगलावरून)