AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : ही एक चूक कधीच करू नका, अन्यथा घरात वारंवार निर्माण होतील आरोग्याच्या समस्या

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे, फेंग शुई नुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो, तेव्हा तुमच्या घरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Feng Shui : ही एक चूक कधीच करू नका, अन्यथा घरात वारंवार निर्माण होतील आरोग्याच्या समस्या
फेंग शुई Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 8:12 PM
Share

फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं म्हटलं गेलं आहे. वास्तुशास्त्र असेल किंवा फेंग शुई असेल या दोन्ही शास्त्रांमध्ये तुमच्या आसपास असणारी ऊर्जा बदलण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्राबाबत असं देखील बोललं जातं की, वास्तुशास्त्रामध्ये केवळ दिशांची माहिती देण्यात आली आहे, मात्र असं नाहीये. तसेच फेंग शुईचं देखील आहे. फेंग शुई आणि वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रानुसार तुमच्या आसपास जेवढ्या काही वस्तू आहेत किंवा तुम्ही दिवसभरात जेवढ्या काही कृती करतात, त्याचा सकारात्मक किंवा नकरातामक प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. आपल्या काही सवयी देखील अशा असतात की ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अशा सवयी बदलल्या पाहिजेत असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. अनेकांना आपलं कपाट काम झाल्यानंतर तसंच उघडं ठेवण्याची सवय असते, असे लोक कधीही कपाट बंद करत नाहीत, मात्र फेंग शुईमध्ये याला अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे.

कपाट कधीही उघड ठेवू नका – जर तुमचं कपाट वारंवार उघड राहत असेल तर त्याला फेंग शुईमध्ये अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे. अनेकांना सवय असते, कपाटामधून एखादी वस्तू घेतली की कपाट बंद न करता तसेच ते उघडे ठेवले जाते. मात्र फेंग शुईमध्ये या सवयीला अशुभ माण्यात आलं आहे. फेंग शुईनुसार जेव्हा तुम्ही तुमचं कपाट उघडं ठेवता, तेव्हा त्यामधून प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, ज्याचा प्रभाव हा केवळ घरातील एकट्या कुटुंब प्रमुखावरच होत नाही तर घरातील सर्व सदस्यांवर याचा परिणाम होतो, त्यामुळे कपाट कधीही उघडं ठेवू नये, यामुळे आरोग्याचे विविध प्रॉब्लेम्स निर्माण होतात. असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नका – फेंग शुईनुसार अशा काही गोष्टी असतात ज्या बेडरूममध्ये ठेवणं अशुभ माण्यात आलं आहे. जसं की बेडरूममध्ये कधीही आरसा ठेवू नये, विशेष: बेडच्या समोर आरसा नसावा असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. यामुळे काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे बेडरूममध्ये कधीच आरसा नसावा असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर.
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप.
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?.
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले.
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा.