AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात नकारात्मक ऊर्जा जाणवतीये? मग करा हे तीन खास उपाय

वास्तुशास्त्र हे प्रामुख्यानं सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन तत्वावर कार्य करतं, जर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल तर तिला कमी कसं करायचं? आणि योग्य ऊर्जा संतुलन कसं ठेवायचं? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : घरात नकारात्मक ऊर्जा जाणवतीये? मग करा हे तीन खास उपाय
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 8:23 PM
Share

प्रत्येकाची अशी इच्छा असते, की जेव्हा आपण कामावरून थकून घरी येतो, तेव्हा घरात शांतता असावी. घरात आल्यानंतर मन प्रसन्न व्हावं, त्याच दृष्टीकोनातून आपण आपल्या घराची सजावट करत असतो. मात्र काही वेळा असं देखील होतं की, आपण जेव्हा घरी येतो, तेव्हा अचानक आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं. कोणीतरी आपल्याकडे काहीतरी ओझं दिलं आहे, असं वाटतं. मनला आनंद मिळत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा घरी येता, तेव्हा जर तुमचं मन अस्वस्थ होत असेल तर तो तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे, याचा संकेत असतो. जर तुम्हालाही असेच काही अनुभव येत असतील तर त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

जेव्हा तुम्हाला असं वाटतं की घरात नकारात्मक ऊर्जा आहे. तेव्हा सायंकाळच्या वेळी देवाची पूजा झाल्यानंतर थोडासा कापूर, थोडासा धूप आणि एक तेज पत्ता तसेच काही लवंगा घेऊन त्यांना एकाचवेळी जाळा आणि या मिश्रणाचा धूर संपूर्ण घरात फिरवा, यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती दूर होईल, तुमचं मन प्रसन्न राहील, तसेच सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून तुमच्या घराचा बचाव होईल असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घराच्या सर्व खिडक्या उघडा – वास्तुशास्त्रानुसार सांयकाळची वेळी ही घरात लक्ष्मी आगमनाची वेळ असते, त्यामुळे लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो आणि घरातील सर्व प्रकारची निगेटिव्हीटी दूर होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

स्वच्छता – वास्तुशास्त्रानुसार आपलं घर हे नेहमी स्वच्छ असावं, घर जर स्वच्छ असेल तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो, तुमची प्रगती होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर.
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप.
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?.
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले.
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा.