Vastu Shastra : सोमवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, तर घरात गरिबी आलीच म्हणून समजा
हिंदू धर्मशास्त्रामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यामुळे प्रत्येक वाराचं वेगळं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार सोमवार हा वार भगवान महादेवांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणं हे निषिद्ध माण्यात आलं आहे.

सोमवार हा वार भगवान महादेवांना समर्पित आहे, तसेच सोमवार हा चंद्राचा वार देखील मानला जातो. चंद्र हा मन, माता, भावना, आणि जल तत्वाचा कारक ग्रह आहे, असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्याची खरेदी सोमवारी करणं हे अशुभ मानलं जातं. जर तुम्ही या गोष्टी सोमवारी खरेदी केल्या तर त्यामुळे ऊर्जेचं असंतुलन होण्याची शक्यता असते. जर ऊर्जेचं असंतुलन झालं तर त्यामुळे मन अस्वस्थ होणं, मानसिक अशांती तसेच अचानक खर्च वाढून, पैशांची समस्या निर्माण होणं, या प्रकारच्या समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. तसेच काहीही कारण नसताना अचानक तुमच्या घरात गृहकलह वाढण्याची देखील शक्यता असते. चला तर आज आपण अशा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सोमवारच्या दिवशी जर खरेदी केल्या तर त्यामुळे तुमच्या घरात चंद्रदोष निर्माण होऊ शकतो.
सोमवारी सोने, चांदी खरेदी करू नका- सोमवार हा चंद्राचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी सोने-चांदी या सारखे मौल्यवान धातू खरेदी न करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. मोती देखील सोमवारी खरेदी करू नये, यामुळे ऊर्जेचं असंतुल निर्माण होतं. ऊर्जेचं असंतुलन निर्माण झाल्यास त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतो. कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही, त्यामुळे सोमवारी सोने-चांदी, मोती या सारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
तांदूळ, दूध किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ- सोमवारी दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. कारण चंद्र हा जल आणि दूध तत्वाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जर सोमवारी तुम्ही अशा वस्तुंची खरेदी केली तर तुमच्या कुंडलीमधील चंद्र कमजोर होतो आणि चंद्रदोष निर्माण होतो. जर कुंडलीमध्ये चंद्रदोष निर्माण झाला तर तुम्हाला विविध अडचणी येऊ शकतात. मानसिक थकवा जाणू शकतो.
पांढरं फूल – सोमवारच्या दिवशी पांढरं फूल खरेदी करू नये, मात्र सोमवारच्या दिवशी पांढरं फूल भगवान महादेवांना अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं. पांढरं फूल हे महादेवांच्या अत्यंत आवडीचं फूल आहे. त्यामुळे महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
