दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी युवा अष्टपैलू खेळाडूचं संघात पुनरागमन, झालं असं की…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागेलं. अन्यथा मालिका तर गमवावी लागेल, इतकंच काय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणितही बिघडेल. असं असताना संघात एक बदल होण्याची शक्यता आहे.

Updated on: Nov 18, 2025 | 6:06 PM
1 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर होणार आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिलचं खेळणं कठीण दिसत आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नितीश कुमार रेड्डीची निवड झाली होती. पण कोलकाता कसोटी सामन्यापूर्वी त्याला संघातून वगळण्यात आलं आणि दक्षिण अफ्रिका अ संघाविरुद्ध वनडे मालिका खेळण्यास पाठवलं.  (फोटो- PTI)

3 / 5
पण दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नितीश कुमार रेड्डीला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आहे. कारण टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाली आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याचं खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. (Photo- Getty Images)

4 / 5
नितीश कुमार रेड्डीला पुन्हा एकदा टीम इंडियात जागा मिळाली आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलची जागा नितीशकुमार रेड्डी घेण्याची शक्यता आहे. तसेच, गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.  (Photo: PTI)

5 / 5
भारताचा कसोटी संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.  (Photo- Getty Images)