IPL 2026 : प्लेऑफची चुरस असताना खेळाडूने टीमची साथ सोडली, कारण?

KKR IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सची 19 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात झाली. मात्र केकेआरने त्यानंतर जोरदार कमबॅक करत प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला केकेआरच्या ऑलराउंडरने कसोटी मालिकेसाठी टीमची साथ सोडली आहे. जाणून घ्या.

Sanjay patil | Updated on: May 15, 2026 | 9:10 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफसाठी चुरस असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. केकेआरचा ऑलराउंडर रचीन रवींद्र याने टीमची साथ सोडली आहे. रचीन न्यूझीलंडला रवाना झाला आहे. रचीनला या मोसमात एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. (Photo Credit : PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफसाठी चुरस असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. केकेआरचा ऑलराउंडर रचीन रवींद्र याने टीमची साथ सोडली आहे. रचीन न्यूझीलंडला रवाना झाला आहे. रचीनला या मोसमात एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. (Photo Credit : PTI)

2 / 5

न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी सराव करता यावा यासाठी रचीन मायदेशी परतल्याचं केकेआरकडून शुक्रवारी 16 मे रोजी सांगण्यात आलं आहे. केकेआरने रचीनसाठी 2 कोटी रुपये मोजले होते. (Photo Credit : PTI)

3 / 5

इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी न्यूझीलंड आयर्लंड विरुद्ध 4 दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 4 जूनपासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 17 ते 21 जून दरम्यान द ओव्हलमध्ये दुसऱ्या कसोटीचा थरार रंगणार आहे. तर तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा नॉटिंघममध्ये होणार आहे. न्यूझीलंड WTC पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5

रचीन रवींद्र याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रचीनने झिंबाब्वे विरुद्ध ऑगस्ट महिन्यात नाबाद 165 धावा केल्या होत्या. तसचे रचीनने ख्राईस्टचर्चमध्ये 176 धावांची खेळी केली होती. तसेच रचीनने विंडीज विरुद्ध डिसेंबरमध्ये 72 धावा केल्या होत्या. (Photo Credit : PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us