
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. पण टीम इंडियात सात खेळाडूंचा समावेश नसेल हे मात्र निश्चित आहे.

2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळलेल्या 7 खेळाडूंना यावेळी स्थान मिळणार नाही. त्यापैकी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. तर 6 खेळाडू शर्यतीतून बाहेर पडले आहेत. चला तर जाणून घेऊयात या खेळाडूबाबत

1- महेंद्रसिंह धोनी: 2019 मध्ये टीम इंडियासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिसलेल्या धोनीने आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी तो एकदिवसीय विश्वचषक संघात नसेल.

2- शिखर धवन: गेल्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियासाठी दोन सामने खेळणाऱ्या धवनने एकूण 125 धावा केल्या. मात्र दुखापतीमुळे त्याला उर्वरित सामन्यांतून बाहेर बसावे लागले. यावेळी 37 वर्षीय धवनचा विचार केला जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे.

3- विजय शंकर: 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक संघासाठी आश्चर्यकारक निवड झालेल्या विजय शंकरने 3 डावात केवळ 58 धावा केल्या. विजय शंकरचं सध्या कुठेच नाव चर्चेत नाही. टीम इंडियाचे दरवाजे आधीच बंद झाले आहेत.

4- केदार जाधव: एकदिवसीय विश्वचषक 2019 साठी आणखी एक आश्चर्यकारक निवड म्हणजे केदार जाधव. पाच सामन्यात खेळलेल्या जाधवने फक्त 80 धावा केल्या होत्या. विश्वचषकानंतर जाधवला टीम इंडियात स्थान मिळालं नाही.

5- भुवनेश्वर कुमार: गेल्या एकदिवसीय विश्वचषकात 6 सामने खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने 10 विकेट घेतल्या होत्या. सध्या त्याचा नावाचा विचार नाही. त्यामुळे भु2023 वनडे विश्वचषक संघात संधी मिळणार नाही, असंच म्हणावं लागेल.

6- ऋषभ पंत: 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 4 सामन्यात फलंदाजी करणाऱ्या पंतने एकूण 116 धावा केल्या होत्या. 2022 मध्ये रस्ता अपघातात जखमी झालेल्या पंतला यावेळेस वनडे विश्वचषक संघात स्थान मिळणं कठीण आहे. कारण दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही.

7- दिनेश कार्तिक: 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन सामन्यात खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने फक्त 14 धावा केल्या. यानंतर दिनेश कार्तिकला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळाले. मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यावेळी दिनेश कार्तिकला टीम इंडियात संधी मिळणं कठीण आहे.