मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या गोटात स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, प्लेऑफचं गणित सुटणार का?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 54वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. असं असताना संघात स्फोटक फलंदाजाची एन्ट्री झाल्याने ताकद वाढली आहे.

| Updated on: May 10, 2026 | 4:10 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची रंगत वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पण मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी आहे. असं असताना आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. संघाचा स्फोटक सलामीवीर फिल सॉल्ट भारतात परतला आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
18 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान सॉल्टच्या डाव्या तर्जनीला दुखापत झाली होती. पुढील तपासणी आणि उपचारांसाठी तो इंग्लंडला परतला होता. त्याच्या गैरहजेरीत जेकब बेथेलला सलामीवीर म्हणून संघात स्थान देण्यात आले. फिल सॉल्ट आता इंग्लंडहून भारतात परतला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
फिल सॉल्ट मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. दुखापतीमुळे सॉल्ट गेल्या आठवड्यापासून मैदानाबाहेर आहे. फिल सॉल्ट 13 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात परत येऊ शकतो. जर सॉल्टला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले, तर जेकब बेथेलला संघातून बाहेर राहावे लागेल.  (Photo: IPL/BCCI)

4 / 5
दुखापत होण्यापूर्वी फिल सॉल्ट उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याने आयपीएल 2026 मध्ये सहा सामन्यांत 202 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडवण्यासाठी झेप घेतल्यावर त्याला दुखापत झाली होती. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर, नुस्खा कुमार, नुस्खा कुमार, नुस्खा कुमार, विनेश रावल अय्यर, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा, जेकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान. (Photo: IPL/BCCI)

Follow Us