
टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वूमन्स वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपल्या नावावर केली. भारताचं यासह 52 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना मेडल देण्यात आलं अपवाद प्रतिका रावल. (PHOTO CREDIT : PTI)

ओपनर प्रतिका रावल या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी एकूण चौथी तर भारताची दुसरी फलंदाज ठरली. प्रतिकाने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 308 धावा केल्या. प्रतिकाने या खेळीसह भारताला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात निर्णायक योगदान दिलं. मात्र प्रतिकाला वर्ल्ड कप विनर मेडल मिळालं नाही. (PHOTO CREDIT : PTI)

प्रतिकाचा वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या मुख्य संघात होती. मात्र प्रतिकाला उपांत्य फेरीआधी दुखापत झाली. प्रतिकाला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. प्रतिकाच्या जागी शफाली वर्माला संधी देण्यात आली. तसेच आयसीसीच्या नियमांनुसार, मुख्य संघातील खेळाडूंना दिलं जातं. प्रतिकाच्या जागी शफालीला संधी मिळाली. त्यामुळे प्रतिकाला मेडल मिळालं नाही. (PHOTO CREDIT : PTI)

प्रतिकाने या दुखापतीनंतरही टीम इंडियाला मैदानाबाहेरुन सपोर्ट केलं. प्रतिका अंतिम सामन्यासाठी मैदानात उपस्थित होती. प्रतिकाने भारताला व्हीलचेअरवरुन सपोर्ट केलं. प्रतिकाने वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंसह डान्स करत जल्लोषही केला. (PHOTO CREDIT : PTI)

प्रतिकाने गेल्या वर्षभरात भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केलीय. प्रतिका टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. प्रतिकाने अनेक स्पर्धेत बॅटिंगने आपली छाप सोडली. मात्र दुखापतीमुळे प्रतिकाचं मेडल हुकलं. (PHOTO CREDIT : PTI)