IPL Playoff: पंजाब किंग्सला प्लेऑफसाठी या दोन संघाची सर्वाधिक भिती, समीकरण एका झटक्यात बिघडणार
आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सची पडझड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेच्या पूर्वार्धात पंजाब किंग्सने एकही सामना गमावला नव्हता. पण सलग सहा पराभवामुळे प्लेऑफचं गणित जर तर वर आलं आहे.

आयपीएल 2026 पंजाब किंग्सने जबरदस्त सुरूवात केली होती. सुरुवातीच्या सात पैकी 6 सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे 13 गुण पदरात पडले. त्यामुळे सहज प्लेऑफ गाठेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी पाठून येत प्लेऑपमध्ये जागा पक्की केली. (Photo: IPL/BCCI)

पंजाब किंग्सची या स्पर्धेत आठव्या सामन्यापासून पराभवाची मालिका सुरू झाली. पंजाब किंग्सने सलग 6 सामने गमावले. त्यामुळे प्लेऑफच्या आशांना सुरूंग लागला आहे. 13 सामन्यानंतरही पंजाबचे 13 गुण आहेत. तसेच शेवटचा सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकला तर 15 गुण होतील. (Photo: IPL/BCCI)

पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे पदरात 15 गुण पडतील. पंजाब किंग्सचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. या सामन्यातील विजयासह इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. खासकरून दोन संघांची कामगिरी महत्त्वाची आहे. (Photo: IPL/BCCI)

पंजाब किंग्सला राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संगांची सर्वाधिक धास्ती आहे. कारण पंजाब किंग्सने शेवटचा सामना जिंकला तरी राजस्थान रॉयल्स आणि केकेआरकडे 15 गुणांचं गणित मोडण्याची ताकद आहे. (Photo: IPL/BCCI)

राजस्थान रॉयल्सने 12 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत. तर दोन सामने शिल्लक आहे. दोन सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील आणि पंजाबच्या पुढे निघून जाईल. केकेआरचेही दोन सामने शिल्लक आहेत. पण 11 गुण असून शेवटचे दोन सामने जिंकले तर 15 गुण होतील. केकेआरने नेट रनरेटमध्ये बाजी मारली तर चौथं स्थान गाठेल. (Photo: IPL/BCCI)