श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद येताच पंजाब किंग्सच्या खेळाडूंची चांदी, इतक्या खेळाडूंची संघात एन्ट्री

PBKS Player in Team India: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर बीसीसीआयने टी20 संघाची धुरा सोपवली आहे. त्याच्याकडे नेतृत्व येताच पंजाब किंग्सच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात वर्णी लागली आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Jul 07, 2026 | 3:21 PM
1 / 5
श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्याकडे नेतृत्व आल्यानंतर एक एक पंजाब किंग्सच्या खेळाडूंची संघात एन्ट्री होताना दिसत आहे. त्यांची संघात निवड होताना दिसत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातही पंजाब किंग्सच्या दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. (Photo: PTI)

2 / 5

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या टी20 संघाची घोषणा नुकतीच झाली आहे. या संघात प्रभसिमरन सिंह आणि यश ठाकुर यांना संधी दिली गेली आहे. आता प्रभसिमरन सिंहची निवड झाली हे समजू शकतो. कारण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण यश ठाकुरच्या निवडीने भुवया उंचावल्या आहेत. (Photo: PTI)

3 / 5

भारतीय संघात चांगले पर्याय असताना यश ठाकुरची निवड झाल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. साकिब हुसैन, रासिक डार, कार्तिक त्यागी सारखे वेगवान गोलंदाज आहे. त्यांनी आयपीएल 2026 स्पर्धेत यश ठाकुरपेक्षा चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केलं आहे. (Photo: PTI)

4 / 5

पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंह आणि यश ठाकुर हे दोनच खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली असं नाही. तर यापूर्वी सूर्यांश शेडगेचीही टीम इंडियात निवड झाली आहे. (Photo: PTI)

5 / 5

सूर्यांश शेडगेला रिप्लेसमेंट म्हणून भारतीय संघात सहभागी केली आहे. नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us