
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा तरूण अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने इतिहास रचला आहे. 42 धावा करत दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. या सामन्यात रचिनची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.

रचिन पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करतो. त्यामुळे गोलंदाजांना त्याचा सामना करताना अडचण येते. श्रीलंकेविरुद्धही रचिनने 34 चेंडूत 42 धावा केल्या.

पदार्पणाच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचिन रवींद्रच्या नावावर आहे. या आधी हा विक्रम इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोच्या नावावर होता.

जॉनी बेअरस्टोने 2019 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 532 धावा करून विक्रम केला होता. आता रचिन रवींद्रने 565 धावा करत त्याला मागे टाकलं आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये कमी वयात 565 धावा करण्याचा विक्रमही रचिनच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

सचिन तेंडुलकरने 1996 मध्ये 523 धावा करून हा विक्रम केला होता. आता हा विक्रम 23 वर्षीय रचिन रवींद्रने मोडला आहे.

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रचिन अव्वल स्थानी आहे. त्याने 565 धावा केल्या आहेत. क्विंटन डिकॉक 550 धावांसह दुसऱ्या, तर 543 धावांसह विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.