IND vs SA Test: रवींद्र जडेजाने अखेर करून दाखवलं! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 17 विकेट पडल्या. भारताचा पहिला डाव 189 धावांवर आटोपला आणि 30 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेने 93 धावांवर 7 गडी गमावले. असं असताना रवींद्र जडेजाने एक विक्रम नावावर केला आहे.

Updated on: Nov 15, 2025 | 8:52 PM
1 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. दुसऱ्या डावात अवघ्या 93 धावांवर दक्षिण अफ्रिकेच 7 गडी बाद झाले आहे. भारताने पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या 30 धावा वजा करता 63 धावा झाल्या आहेत. आता तिसऱ्या दिवशी 3 गडी झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
पहिल्या डावात एकही विकेट न मिळालेल्या रवींद्र जडेजाने दुसर्‍या डावात कमाल केली. यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. ईडन गार्डनवर दोन विकेट घेताच त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.  इतकंच रवींद्र जडेजाने भारतात 250 विकेट घेण्याचा पल्लाही गाठला आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
रवींद्र जडेजाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात एकूण 13 षटकं टाकली.  यात तीन षटकं निर्धाव टाकली. तसेच 29 धावा देत 4 गडी बाद केले. सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक विकेटचा विक्रम मोडण्यासाठी त्याला दोन विकेटची गरज होती. पण आता हा विक्रम मोडून पुढे गेला आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
ईडन गार्डन्सवर सचिन तेंडुलकरने 13 कसोटी सामन्यातील 12 डावात पाच विकेट घेतल्या आहेत. आता हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावर झाला आहे. कारण त्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एकूण 8 विकेट या मैदानात घेतल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
भारतीय अष्टपैलू खेळाडूने कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात मोठी कामगिरी केली. यापूर्वी फक्त तीन खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. आता चौथं नाव रवींद्र जडेजाचं आहे. जडेजाने कसोटीत 4000 धावा पूर्ण केल्या. भारतीय क्रिकेटपटू कपिल देव, न्यूझीलंडचे डॅनियल व्हेटोरी आणि इंग्लंडचे इयान बोथम यानी यापूर्वी हा टप्पा गाठला होता. (Photo- BCCI Twitter)