
विजय हजारे ट्रॉफीत दिग्गज खेळाडूंनी आपला चमकदार खेळ दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं. दुसरीकडे, रिंकु सिंहने देखील फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. रिंकु सिंहची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. पण प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवणं कठीण आहे. पण सध्याचा त्याचा खेळ पाहता त्याला जागा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. (Photo: PTI)

विजय हजारे ट्रॉफीत रिंकु सिंह उत्तर प्रदेश संघाकडून खेळत आहे. तिसऱ्या सामन्यातही रिंकु सिंहने कमाल केली. त्याने बडोद्याविरुद्धच्या सामन्यात 67 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्याने 3 षटकार आणि 2 चौकार मारले. (Photo-Screenshot/Instagram)

रिंकु सिंहने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा 50हून अधिक धावा ठोकल्या आहेत. यापूर्वी चंदीगडविरुद्ध नाबाद 106 दााव केल्या होत्या. हैदराबादविरुद्ध 67 धावांची खेळी केली होती. (Photo: PTI)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड झाल्यापासून रिंकु सिंहची बॅट तळपली आहे. विजय हजारे ट्रॉफीत सातत्याने धावा करत आहे. त्याने तीन सामन्यात 236 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून रिंकु जबरदस्त कामगिरी करत आहे. (Photo: PTI)

बडोद्याविरुद्धच्या सामन्यात रिंकु सिंहने हार्दिक पांड्याचा भावासह सहा गोलंदाजांचा सामना केला. यावेळी रिंकु सिंहने कृणाल पांड्याने टाकलेल्या 19 चेंडूत 27 धावा काढल्या. रिंकुने कृणाल पांड्याला दोन षटकार ठोकले. (Photo: PTI)