IPL स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, मागच्या पाच वर्षात फक्त एकच झेल सोडला

आयपीएल स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाजांची चर्चा होत असते. पण काही आपल्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत असतात. खरं क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हंटलं जातं. त्यामुळे क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित होते. मागच्या पाच वर्षातील सर्वात बेस्ट क्षेत्ररक्षकाबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 03, 2026 | 6:49 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेत अनेक विक्रम रचले आणि मोडले जातात. हे काय आता नवीन राहिलं नाही. काही विक्रम दुर्मिळ असून ते अजूनही अबाधित आहेत. फलंदाज आणि गोलंदाज स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावतात. पण क्षेत्ररक्षकाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. कारण एक झेल सामन्याचं अख्खं चित्र बदलून टाकते. चला जाणून घेऊयात 2022 पासून ते 2026 या वर्षातील बेस्ट क्षेत्ररक्षक (Photo- PTI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेतील मागच्या पाच वर्षांची आकडेवारी काढली तर झेल पकडण्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलचं नाव येतं. या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएल 2022 पासून आतापर्यंत 51 सामन्यात 24 झेल पकडले आहेत. तर फक्त 2 झेल ड्रॉप झाले आहेत. (Photo- PTI)

3 / 5
केएल राहुल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने मागच्या पाच वर्षात 49 सामन्यात 32 झेल पकडले आहेत. तर दोनच झेल सुटले आहे. त्याची झेल पकडण्याची क्षमता 94.1 टक्के इतकी आहे. (Photo- PTI)

4 / 5
तिसऱ्या क्रमांकावर मार्को यानसेन असून त्यान 34 सामन्यात 21 झेल पकडले आहेत. त्याच्याकडून फक्त एकच झेल सुटला आहे. त्याची झेल पकडण्याची क्षमता 95.4 टक्के आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा फिल सॉल्ट येतो. त्याने 35 सामन्यात 29 झेल पकडले असून त्याची झेल पकडण्याची क्षमता 96.99 टक्के आहे. (Photo- PTI)

5 / 5
रिंकु सिंह या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो. त्याने 47 सामन्यात 36 झेल पकडले आहेत. फक्त एकच झेल त्याच्या हातून सुटला आहे. त्याची झेल पकडण्याची क्षमता 97.3 टक्के आहे. त्यामुळे मागच्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता रिंकु सिंह बेस्ट क्षेत्ररक्षक आहे. (Photo- PTI)

Follow Us