मँचेस्टर कसोटी सामन्यात ऋषभ पंतकडे मोठा विक्रम रचण्याची संधी, 40 धावा केल्या की झालं…

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात विकेटकीपर आणि डावखुरा फलंदाज ऋषभ पंतला एक मैलाचा दगड गाठण्याची संधी आहे. रोहित शर्माला मागे टाकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील नंबर 1 फलंदाज ठरू शकतो.

| Updated on: Jul 19, 2025 | 8:06 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत तीन कसोटी सामने पार पडले असून या सामन्यात ऋषभ पंतची बॅट चांगलीच तळपली आहे. पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने शतकी खेळी केली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतही त्याने चांगली कामगिरी केली. आता त्याच्या चौथ्या कसोटी विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo- BCCI)

2 / 5
इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये ऋषभ पंतने 425 धावा केल्या आहेत.भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माला मागे टाकण्यापासून फक्त 40 धावा दूर आहे. जर पंतने मँचेस्टर कसोटीत 40 धावा केल्या तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा नंबर 1 फलंदाज ठरेल. (Photo- BCCI)

3 / 5
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऋषभ पंतने आतापर्यंत 37 सामन्यांमध्ये 43.17 च्या सरासरीने 2677 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा त्याच्या फक्त 39 धावा पुढे आहे. रोहित शर्माने 40 सामन्यांमध्ये 41.15 च्या सरासरीने 2716 धावा केल्या आहेत.(Photo- BCCI)

4 / 5
ऋषभ पंतनंतर विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 46 सामन्यांमध्ये 35.36 च्या सरासरीने 2617 धावा केल्या आहेत. तर शुबमन गिलने 35 सामन्यांमध्ये 41.66 च्या सरासरीने 2500 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI)

5 / 5
लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली आहे. विकेटकीपिंग करताना बोटाला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याने फलंदाजी केली असली तरी, मँचेस्टर कसोटीत खेळणे त्याच्यासाठी खूप कठीण वाटते. भारतीय संघ व्यवस्थापन ऋषभ पंतबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल? (Photo- BCCI)