MI vs CSK : धोनीचा दणका, रोहितचं शतक, मुंबई-चेन्नई सामन्यात महारेकॉर्ड्स

| Updated on: Apr 15, 2024 | 5:35 PM

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Records : मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सकडून वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत व्हावं लागलं. मात्र या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी रेकॉर्ड्स केले. जाणून घ्या.

1 / 6
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. चेन्नईने हा सामना 20 धावांनी जिंकून मुंबईवर मात केली.

2 / 6
रोहित शर्मा याने विजयासाठी मिळालेल्या 207 धावांचा पाठलाग करताना नाबाद शतकी खेळी केली. रोहितने मुंबईकडून चेन्नई विरुद्ध नाबाद 105 धावा केल्या. या सामन्यात  अनेक रेकॉर्ड्स झाले.

3 / 6
रोहितने शतकी खेळी दरम्यान 5 सिक्स ठोकले. रोहितने यासह खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला. रोहितने 500 सिक्सचा टप्पा पूर्ण केला. रोहित अशी कामगिरी पहिला आशियाई फलंदाज ठरला.

4 / 6
महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या डावातील 4 बॉल बाकी असताना बॅटिंगसाठी आला. धोनीने या 4 बॉलमध्ये माहोल बदलला. धोनीने हार्दिक पंड्या याच्या बॉलिंगवर 4 बॉलमध्ये 6,6,6,2 अशा एकूण नाबाद 20 धावा केल्या. धोनीने 500 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार धावा पूर्ण केल्या.  धोनी चेन्नईसाठी 5 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.

5 / 6
महेंद्रसिंह धोनी याचा हा चेन्नईसाठीचा 250 वा सामना होता. धोनी चेन्नईसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला.

6 / 6
चेन्नईच्या मथीशा पथीराणा याने मुंबई विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. मथीशा यासह चेन्नईसाठी 4 विकेट्स घेणारा युवा गोलंदाज ठरला. मथीशा याने वयाच्या 21 वर्ष 118 व्या दिवशी ही कामगिरी केली.