
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील विजयानंतर रोहित शर्मा आता श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने कूच करणार आहे. ही मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा एक विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. तीन सामन्यात फक्त 59 धावा करताच त्याच्या नावावर हा विक्रम प्रस्थापित होणार आहे. यासह रोहित शर्मा राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढणार आहे.

वनडे कारकिर्दीत रोहित शर्माने 262 सामन्यांत 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.

श्रीलंका मालिकेत रोहित शर्माने 59 धावा करताच पाचव्या स्थानी पोहोचणार आहे. कारण या स्थानावर असलेल्या राहुल द्रविडच्या नावावर 10768 धावा आहेत. द्रविडला मागे टाकण्यासाठी फक्त 59 धावांची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. आता कर्णधार म्हणूनही त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. श्रीलंकेविरुद्धच्या रोहितने 3 षटकार मारताच अव्वल स्थान गाठेल. रोहितच्या नावावर सध्या 231 षटकार असून इऑन मॉर्गनच्या नावावर 233 षटकार आहेत.