
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. संघाची धुरा बीसीसीआयने शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. रोहित शर्माची संघात निवड करूनही हा बदल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हिटमॅन युगाचा शेवट झाला आहे. (Photo- PTI)

रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये आपलं नशिब पणाला लावणार आहे. त्याला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी रोहित शर्माला या वर्षात खेळले जाणारे सहा सामने महत्त्वाचे असणार आहेत. (Photo- PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (Photo- PTI)

रोहित शर्माने या सहा सामन्यात चांगली कामगिरी केली तरच त्याला वनडे संघात कायम ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी 6 वनडेतील सहा दिवस खूपच महत्त्वाचे आहेत. या सामन्यात अपयशी ठरला तर पुढे संघात निवड होणं कठीण आहे. कर्णधार नसल्याने आता हे गणित सोपं होईल. (Photo- PTI)

बीसीसीआय वनडे वर्ल्डकप 2027 डोळ्यासमोर ठेवून संघाची बांधणी करत आहे. यासाठी आता दीड वर्षांचा अवधी आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता रोहित शर्मा या संघात असेल की नाही हे दोन मालिकांमध्ये स्पष्ट होईल. (Photo- PTI)

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरला तर त्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एक संधी दिली जाईल. जर या मालिकेतही त्याने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही तर 2026 मालिकेसाठी त्याची निवड होणं कठीण आहे. त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. (Photo- BCCI)