
इंग्लंडने पहिल्यांदा घेतलेला गोलंदाजीचा निर्णय अंगलट आला. दक्षिण आफ्रिकेने 400 धावांचं लक्ष्य दिलं. पण इंग्लंडचा संघ 170 धावाच करू शकला. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 229 धावांनी पराभूत केलं.

इंग्लंडचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठा पराभव आहे. तर दक्षिण आपला विक्रम मोडण्यात अपयशी ठरली आहे. मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाने 2022 मध्ये इंग्लंडला 221 धावांनी पराभूत केलं होतं. 2018 मध्ये श्रीलंकाने इंग्लंडला 219 धावांनी नमवलं होतं. आता इंग्लंडला 229 धावांनी पराभूत करण्यात आलं आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंची स्थिती एकदम वाईट आहे. चार पैकी तीन सामने गमवल्याने नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे.

इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित पाच पैकी पाच सामने जिंकणं आवश्यक आहे. तसेच एखाद्या सामन्यात चमत्काराची गरज आहे.

इंग्लंडचा पुढचा सामना 26 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. तर 29 ऑक्टोबरला लखनऊच्या एकाना मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड सामना होईल.