सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, लॉर्ड्सवर मिळाला इतका मोठा मान

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यामुळे त्याचा नावलौकीक संपूर्ण जगभर आहे. आता त्याला आणखी सन्मान मिळाला आहे. सचिन तेंडुलकर आता लॉर्ड्सवर कायमस्वरूपी असणार आहे.

| Updated on: Jul 10, 2025 | 5:49 PM
1 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची कामगिरी अद्यापही स्मरणात आहेत. आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण सचिन तेंडुलकर कायमचा लॉर्ड्सवर दिसणार आहे.  (Photo: Getty Images)

2 / 5
सचिन तेंडुलकरने अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेदरम्यान लॉर्ड्सवर त्याच्या तैलचित्राचे उद्घाटन केले. यावेळी एमसीसीचे अध्यक्ष मार्क निकोलस यांची उपस्थिती होती.  (Photo: Getty Images)

3 / 5
सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. पण लॉर्ड्सवर त्याच्या नावावर एकही शतक नाही. त्यामुळे त्याचं नाव सन्मान फलकावर नाही. पण आता स्टेडियमच्या भिंतीवर कायमस्वरुपी दिसणार आहे.  (Photo: Getty Images)

4 / 5
सचिन तेंडुलकरने कसोटी कारकि‍र्दीत लॉर्ड्सवर पाच कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 21.66 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत.  (Photo: Getty Images)

5 / 5
लॉर्ड्स मैदानात सचिन तेंडुलकर याच्या आधी लॉर्ड्स मैदानाच्या भिंतीवर शेन वॉर्नचं चित्र लावण्यात आले आहे.  (Photo: Getty Images)