
विराट कोहली आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. 11 जानेवारीपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम विराटच्या रडारवर आहे. (Photo- PTI)

विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27975 धावा केल्या आहेत. यात कसोटी, वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील धावा आहे. विराट कोहलीला 28 धावा गाठण्यासाठी फक्त 25 धावांची गरज आहे. (Photo- PTI)

आतापर्यंत जगातील दोनच क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 धावांचा पल्ला गाठला आहे. आता या पंगतीत विराट कोहलीला मानाचं स्थान मिळणार आहे. इतकंच काय तर विराट कोहली या स्थानावर पोहोचणारा वेगवान फलंदाज ठरेल. (Photo- PTI)

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,357 धावा केल्यात. तर कुमार संगकाराने 28016 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने 28 हजार धावा करण्यासाठी 644 डाव खेळले. कुमार संगकाराने 666 डाव खेळले. कोहलीने आतापर्यंत 623 आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत.(Photo- PTI)

11 जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेत 28 हजार धावा पूर्ण करेल. पहिल्या सामन्यातच करेल अशी अपेक्षा आहे. तसं केलं तकर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढेल. कारण 624 डावात ही उंची गाठणार आहे. (Photo- PTI)