
आयपीएल 2019 मिनी लिलावापूर्वी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला विकत घेण्यात रस दाखवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्स संजू सॅमसनच्या बदल्यात शिवम दुबे आणि रचिन रवींद्रला विकण्याचा विचारात आहे. आता दोन्ही फ्रेंचायझी याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आयपीएल 2026 ट्रेड विंडो 4 जुलैपासून ओपन होणार आहे. या विंडोद्वारे खेळाडूंची देवाणघेवाण तसेच खरेदी करण्याची संधी मिळेल. या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनसाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नई सुपर किंग्सकडे ट्रेडमार्क चेहरा नाही. पोकळी भरून काढणं सीएसकेला कठीण जाईल. यासाठी राजस्थानच्या कॅप्टन कूल संजू सॅमसनला संघात घेण्याची तयारी दर्शवली आहे.

2021 मध्ये राजस्थान रॉयल्स संघात असलेल्या रॉबिन उथप्पाला ट्रेड विंडोच्या माध्यमातून सीएसकेने घेतलं होतं. आता चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा दाक्षिणात्य खेळाडूवर लक्ष केंद्रीत करून आहे. मिनी लिलावापूर्वी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी होण्याची शक्यता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क/कन्नड)