
ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 338 धावा केल्या आणि विजयासाठी 339 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दबाव होता. त्यामुळे सलामीला आलेल्या शफाली वर्माकडून अपेक्षा होत्या. पण तिने भारतीय क्रीडाप्रेमींचा अपेक्षाभंग केला. (PC-PTI)

शफाली वर्माने फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक पवित्रा दाखवला. झटपट धावा करताना दोन चौकार मारले. पण किम गार्थच्या गोलंदाजीवर नको ती चूक करून बसली. आत येणाऱ्या चेंडूवर फटका मारताना चुकली आणि विकेट देऊन बसली. पायचीत होत तिला तंबूत परतावं लागलं. शफालीने रिव्ह्यू घेतला आणि तो वाया गेला. (PC-PTI)

शफाली वर्माबाबत ज्या गोष्टीची भीती होती ती बाब अखेर सत्यात उतरली. शफाली वर्मा भारतासाठी कोणत्याही बाद फेरीत चांगली कामगिरी करू शकलेली नाही. सलग पाचव्यांदा बाद फेरीत मोठी खेळी करण्यास अपयशी ठरली. (PC-PTI)

शफाली वर्माने 2020 टी20 वर्ल्डकप अंतिम फेरीत पहिल्यांदा बाद फेरीत खेळली होती. पण फक्त 2 धावा करून बाद झाली. त्यानंतर 2022 मध्ये कॉमनवेल्थ उपांत्य फेरीत फक्त 15 धावा करू शकली. तसेच अंतिम फेरीतही फक्त 11 धावांचं योगदान दिलं. (PC-PTI)

2023 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फक्त 9 दावा करता आल्या. आता वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही तिची बॅट काही चालली नाही. आताही ती फक्त 9 धावा करून बाद झाली. (PC-PTI)