Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने लखनौविरुद्ध शतकी करत विक्रम नोंदवला, असं करणारा पहिला कर्णधार ठरला
आयपीएल 2026 स्पर्धेतील 68व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौला 7 गडी राखून पराभूत केलं. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरची खेळी महत्त्वाची ठरली.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 124 शतके झळकावली गेली आहेत. या दरम्यान 11 कर्णधारांनी शतकी खेळी केली आहे. या 11 जणांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरने शतक वेगळं ठरलं आहे. (Photo: IPL/BCCI)

लखनौ येथील एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 51 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 101 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI)

श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासात मधल्या फळीत फलंदाजी करताना शतक झळकावणारा पहिला कर्णधार ठरला. तसेच आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक झळकावून नाबाद राहणारा तो दुसरा कर्णधारही ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2016 मध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना 108 धावांची नाबाद खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना शतक झळकावणारा आणि नाबाद राहणारा पहिला कर्णधार ठरला होता. (Photo: IPL/BCCI)

श्रेयस अय्यरने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शानदार शतक झळकावून श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतक करणारा पहिला कर्णधार आणि नाबाद शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)