IND vs AUS : महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम कर्णधार गिलने केला नावावर, झालं असं की…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानात झाला. या सामन्यात कर्णधार गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. काय ते जाणून घ्या

| Updated on: Oct 19, 2025 | 4:10 PM
1 / 5
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे 26 षटकांचा सामना झाला. भारताने 9 गडी गमवून 136 धावा केल्या. भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे फेल गेली.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
शुबमन गिल या मालिकेपासून वनडे संघाची धुरा सांभाळत आहे. पण पहिल्याच सामन्यात काही खास करू शकला नाही. अवघ्या 10 धावा करून बाद झाला. पण असं असूनही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
शुबमन गिलने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. तसेच भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवणारा कमी वयाचा कर्णधार ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
शुबमन गिलने 26 वर्षे आणि 41 दिवसांचं असताना हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर धोनीने यापूर्वी 26 वर्षे आणि 279 दिवसांचा असताना तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवलं होतं. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
शुबमन गिल हा टी20 संघाचा रेग्युलर कर्णधार नाही. भारताने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर झिम्बाब्वे दौरा केला होता. तेव्हा शुबमन गिलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यानंतर कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं. आता टी20 वर्ल्डकप 2026 नंतर हे पद गिलकडे येईल असं सांगण्यात येत आहे. (Photo- BCCI Twitter)