
टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अपयशी ठरला. शुबमन गिल 4 धावांवर बाद झाला. शुबमनची यासह टी 20i क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. शुबमन टी 20i क्रिकेटमधील गेल्या 6 डावांत अपयशी ठरला आहे. (Photo Credit: PTI)

शुबमनला या निराशाजनक कामगिरीदरम्यान गूड न्यूज मिळण्याची शक्यता अधिक आहे. बीसीसीआयकडून लवकरच वार्षिक करार जाहीर केला जाणार आहे. शुबमनला या वार्षिक करारात बीसीसीआयकडून प्रमोशन दिलं जाऊ शकतो. शुबमनला वार्षिक करारात ए प्लस श्रेणी दिली जाऊ शकते. (Photo Credit: PTI)

शुबमनचं गेल्या काही महिन्यांत टीम इंडियातील वजन वाढलं आहे. शुबमनला रोहितच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाचं नेतृत्व देण्यात आलंय. तसेच शुबमनला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तसेच शुबमन टी 20i टीमचा कॅप्टनही आहे. त्यामुळे शुबमनला बीसीसीआयकडून वार्षिक करारात ए प्लस ग्रेड मिळण्याची शक्यता अधिक आहे. (Photo Credit: PTI)

बीसीसीआयकडून खेळाडूंना 4 श्रेणींनुसार वार्षिक करार देण्यात येतो. ए प्लस, ए, बी आणि सी या 4 श्रेणींनुसार खेळाडूंना वार्षिक करारानुसार किती रक्कम मिळणार हे ठरतं. खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी या श्रेणींनुसार अनुक्रमे 7,5,3 आणि 1 कोटी रुपये दिले जातात. (Photo Credit: PTI)

सध्या ए प्लस कॅटेगरीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या 4 खेळाडूंचा समावेश आहे. तर आता बीसीसीआयकडून या श्रेणीत शुबमनचा समावेश केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता शुबमनचा या श्रेणीत समावेश केला जाणार की नाही? हे बीसीसीआयकडून जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit: PTI)