वर्ल्डकप विजेत्या संघातील सहा खेळाडूंना आशिया कप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता, कोण ते जाणून घ्या

वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील विजेत्या संघातील निम्मा संघ आशिया कप स्पर्धेतून आऊट झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघात शुबमन गिलला संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना डावलण्यात आलं आहे.

| Updated on: Aug 19, 2025 | 10:01 PM
1 / 7
आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. मात्र टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळलेल्या सहा खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. चला जाणून घेऊयात

2 / 7
रोहित शर्मा या यादीत पहिलं नाव आहे. वर्ल्डकप विजयानंतर त्याने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत खेळण्याचा प्रश्नच येत नाही.

3 / 7
दुसरं नाव आहे रनमशिन्स विराट कोहलीचं..टी20 वर्ल्डकप विजयानंतर त्यानेही या फॉर्मेटला रामराम ठोकला. त्यामुळे त्याला संघात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

4 / 7
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा करणारा रवींद्र जडेजा हा तिसरा खेळाडू आहे. शॉर्ट-फॉर्म क्रिकेटला निरोप देणारा जडेजा आता एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे.

5 / 7
टी20 विश्वचषकात युजवेंद्र चहलचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला होता. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. 2023 पासून चहलने भारतासाठी एकही टी20 सामना खेळलेला नाही. आता आशिया कप संघातही स्थान मिळालं नाही.

6 / 7
टी20 विश्वचषकात ऋषभ पंतची टीम इंडियासाठी यष्टीरक्षक म्हणून निवड झाली होती. आशिया कपमध्येही स्थान मिळण्याची अपेक्षा होती. पण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला आशिया कप संघातून वगळण्यात आले.

7 / 7
टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या मोहम्मद सिराजची आगामी आशिया कपसाठी निवड झालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सिराजला विश्रांती देण्यासाठी टी20 संघातून वगळण्यात आले आहे.