स्मृती मंधानाने मोडला मिताली राजचा विक्रम, काय केलं ते जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव झाला. या सामन्यात स्मृती मंधानाने 88 धावांची खेळी केली आणि एक विक्रम आपल्या नावावर केला.

| Updated on: Oct 20, 2025 | 10:48 PM
1 / 5
वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेत टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. उपांत्य फेरीत जागा मिळवायची तर उर्वरित दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. असं असताना स्मृती मंधानाला सूर गवसला ही जमेची बाजू आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना गमावला असला तरी तीने 88 धावांची खेळी केली. यासह तिने एक विक्रम नावावर केला आहे. (Photo- PTI)

2 / 5
स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळीसह माजी क्रिकेटपटू मिताली राजचा विक्रम मोडला आहे. महिला वनडे क्रिकेटमध्ये भारताता सर्वाधिक 50 हून अधिका धावा करणारी फलंदाज ठरली आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.  (Photo- PTI)

3 / 5
वनडे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या नावावर आहे. तिने 28 वेळा ही कामगिरी केली आहे. आता स्मृती मंधाना या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. स्मृती  मंधानाच्या नावावर 23 अर्धशतकं झाली आहे.  (Photo- PTI)

4 / 5
स्मृती मंधानाने या वर्षात नवव्यांदा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीच्या तीन सामन्यात फेल गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 80 आणि इंग्लंडविरुद्ध 88 धावांची खेळी केली.  (Photo- PTI)

5 / 5
मंधानाने साखळी फेरीत न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतकी खेळी केली तर आणखी एक विक्रम नावावर होईल. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारी महिला फलंदाज ठरेल.  (Photo- PTI)