स्मृती मंधानाने फक्त 23 धावा केल्या, पण मोठा विक्रम केला नावावर; जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील दहावा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरु आहे. या सामन्यात भारताची स्थिती नाजूक आहे. मधली फळी पूर्णपणे फेल गेली. सलामीला आलेल्या स्मृती मंधानाने 23 धावा केल्या आि एक विक्रम नावावर केला.

| Updated on: Oct 09, 2025 | 6:52 PM
1 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळण घेत आहे. तिसऱ्या टप्प्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे.भारताला 150 धावा गाठताना चांगलाच घाम गाळावा लागला. दुसरीकडे, स्मृती मंधानाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: PTI)

2 / 5
स्मृती मंधाना वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यातही फेल गेली. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फक्त 23 धावा काढता आल्या. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध 23 आणि श्रीलंकेविरुद्ध 8 धावा काढल्या होत्या. असं असूनही स्मृती मंधानाच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. (Photo: PTI)

3 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 13 धावा करताच तिने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एका कॅलेंडर वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मंधानाने यासह 28 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. (Photo: PTI)

4 / 5
1997 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 970 धावा केल्या होत्या. आता मंधानाने तिला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मंधानाने 982 धावा केल्या आहेत. स्पर्धेत यात अजून धावांची भर पडू शकते. (Photo: PTI)

5 / 5
वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेत स्मृती मंधानाने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये फक्त 54 धावा केल्या आहेत. तिची सरासरी फक्त 18 आहे . तिचा स्ट्राइक रेट फक्त 72.9 आहे. (Photo: PTI)