
भारतीय कसोटी क्रिकेटला गेल्या काही मालिकांपासून ग्रहण लागलं आहे. देशात खेळलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दैना झाली आहे. न्यूझीलंडने क्लिन स्विप दिल्यानंतर आता दक्षिण अफ्रिका देखील त्याच मार्गावर आहे. दक्षिण अफ्रिका घरच्या मैदानावर 93 वर्षांचं वर्चस्व संपुष्टात आणून इतिहास रचला आहे. एखाद्या संघाने भारतासमोर 548 धावांचं लक्ष्य ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Photo- Proteas Men Twitter)

93 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात भारताला चौथ्या डावात कधीच इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागला नाही. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला आणि इतकं मोठं लक्ष्य ठेवलं. भारतीय गोलंदाजांच्या नामुष्कीमुळे इतकं मोठं लक्ष्य ठेवण्यात दक्षिण अफ्रिकेला यश आलं आहे. (Photo- Proteas Men Twitter)

2004 मध्ये नागपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 542 धावांचे लक्ष्य ठेवले होते. घरच्या मैदानावर चौथ्या डावात संघाने दिलेले हे सर्वोच्च लक्ष्य होते. आता दक्षिण आफ्रिकेने 21 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo- Proteas Men Twitter)

पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने 288 धावांची आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या डावात अगदी 260 धावा केल्या आणि डाव घोषित केला. 548 धावांसह दक्षिण आफ्रिकेने भारतात चौथ्या डावात दिलेले सर्वोच्च लक्ष्य करण्याचा विक्रम केला आहे. (Photo- BCCI Twitter)

या धावांचा पाठलाग करून विजय मिळवणं खूपच कठीण आहे. कारण शेवटच्या डावात फक्त एकदाच 500 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात यश आलं होतं. 1939 मध्ये दक्षिण अफ्रिकेने 696 धावांचं लक्ष्य ठेवलं तेव्हा इंग्लंड 656 धावा केल्या आणि हा सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे भारतीय संघ विजय तर मिळवणार नाही हे निश्चित आहे. पण ड्रॉ करणंही कठीण दिसत आहे. (Photo- BCCI Twitter)