क्रिकेट विश्वात नवीन ट्रेंड! तीन संघांनी पराभवाची मालिका मोडत मिळवलं जेतेपद, वाचा कोण ते

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. यासह 27 वर्षानंतर आयसीसी जेतेपद मिळवलं. दक्षिण अफ्रिकेची ही दुसरी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी 1998 मध्ये दक्षिण अफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यासह एका नव्या ट्रेंडचा उदय झाला आहे.

| Updated on: Jun 15, 2025 | 3:17 PM
1 / 5
क्रिकेटविश्वात आतापर्यंत काही संघांबाबत पराभवाचा ट्रेंड पक्का होता. त्यामुळे या संघांकडून जेतेपदाची अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं होतं. दक्षिण अफ्रिकन संघाला तर चोकर्स म्हणून ठपका लागला होता. पण दीर्घ प्रतीक्षेनंतर क्रीडाविश्वात एक नवा ट्रेंड सेट झाला आहे. (PHOTO- ICC Twitter)

2 / 5
2025 हे वर्ष तीन संघांसाठी खूपच लकी ठरलं आहे. कारण तीन संघांनी जेतेपदासाठी वर्षानुवर्षे वाट पाहिली. पण 2025 या वर्षात जेतेपदाची चव चाखता आली आहे. तीन संघ कोणते आणि त्यांचा क्रिकेटविश्वातील रेकॉर्ड काय ते जाणून घ्या. (PHOTO- RCB Twitter)

3 / 5
होबार्ट हरिकेन्स हा ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगचा विजेता संघ आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाने सिडनी सिक्सर्सचा 7 विकेट्सने पराभव करून पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. 14 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना हे यश मिळालं. जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगलेल्या होबार्ट हरिकेन्स संघाने यावेळी उत्तम कामगिरी केली. (PHOTO- Hobart Hurrricanes Twitter)

4 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18व्या पर्वात जेतेपद मिळवून स्वप्नपूर्ती केली आहे. गेली अनेक वर्षे चाहते इ साला कप नामदे ही घोषणा देत सामने पाहायचे. मात्र यंदा ही इच्छा पूर्ण झाली. 17 वर्षे प्रदीर्घ वाट पाहिल्यानंतर 18 व्या पर्वात हे स्वप्न पूर्ण झालं आहे. (PHOTO- RCB Twitter)

5 / 5
आयसीसी स्पर्धेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जेतेपद मिळवून माथ्यावरी चोकर्सचा डाग पुसला आहे. 27 वर्षांनंतर दक्षिण अफ्रिकेने आयसीसी स्पर्धेत यश मिळवलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं. (PHOTO- ICC Twitter)