Sree Charani Record: श्री चरणीने वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रचला विक्रम, 12 विकेटसह केली अशी कामगिरी
INDW vs BANW: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने बांगलादेशला 136 धावांवर रोखलं. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत बांगलादेशला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. यात फिरकीपटू श्री चरणीने एक विक्रम रचला.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची फिरकीपटू श्री चरणीने कमाल केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात तिने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना फिरकीवर नाचवलं आहे. या कामगिरीसह श्री चरणी या स्पर्धेत एक खास विक्रम रचला आहे. (Photos Credit: Getty Images)

श्री चरणीने बांगलादेशविरुद्ध 2 विकेट घेतल्या आणि वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय गोलंदाज ठरली आहे. (Photos Credit: Getty Images)

श्री चरणीने लेग स्पिनर पूनम यादवचा विक्रम मोडीत काढला आहे. तिने 2020 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 10 विकेट घेतल्या होत्या. या स्पर्धेत श्री चरणीच्या गोलंदाजीवर 4 झेलही सुटले. नाही तर हा आकडा आणखी वेगळा असता. तसेच विश्वविक्रम मोडला असता. (Photos Credit: Getty Images)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या एमिलिया कर्रच्या नावावर आहे. तिने एक पर्वात 15 विकेट घेतल्या होत्या. श्री चरणीने आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहे. जर चार झेल पकडले गेले असते तर 16 विकेट नावावर झाल्या असत्या. (Photos Credit: Getty Images)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक 15 विकेट न्यूझीलंडच्या एमिलिया कर्र, 13 विकेट इंग्लंडची अन्या श्रुबसोलो, 13 विकेट ऑस्ट्रेलियाची मेगन स्कट, 12 विकेट दक्षिण अफ्रिकेची नॉनकुलुलेको म्लाबा हिच्या नावावर आहे. आता या यादीत श्री चरणीचा समावेश झाला आहे. (Photos Credit: Getty Images)