
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी 20 संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय संघही टी20 मालिका खेळत असून तयारी करत आहे. दुसरीकडे काही संघ महत्त्वाचे बदल करत आहे. असाच एक निर्णय श्रीलंकेने घेतला आहे. (Photo: Getty Images)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत गेल्या 12 वर्षांपासून श्रीलंकेची झोळी रिती आहे. त्यासाठी आता श्रीलंकेने जोरदार तयारी केली आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक आर श्रीधर यांची नियुक्ती केली आहे. श्रीलंकेने श्रीधर यांना टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी क्षेत्ररक्षण कोच म्हणून नियुक्त केलं आहे. (Photo: Getty Images)

आर श्रीधर पहिल्यांदाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी असतील. अलीकडेच श्रीलंकेच्या राष्ट्रीय उच्च कामगिरी केंद्रात दहा दिवसांचा क्षेत्ररक्षक शिबिर आयोजित केला, ज्यामुळे त्यांना श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. (Photo: SLC)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीधर श्रीलंकन संघासोबत दोन महत्त्वाच्या विदेश दौऱ्यावर काम करतील. पहिल्यांदा पाकिस्तानमधील टी20 मालिकेसाठी श्रीलंकन प्रशिक्षक स्टाफचा भाग असतील. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची तयारी करून घेतली. हा दौरा आटोपला की वर्ल्डकप संघाचा भाग असतील. (Photo: Getty Images)

55 वर्षीय श्रीधर हे हैदराबादचे माजी फिरकीपटू असून भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदाचे दीर्घकाळ सदस्य होते. 2014 मध्ये त्यांना पहिल्यांदा टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यानंतर रवी शास्त्री यांच्या स्टाफचा भाग राहिले आणि 2021 पर्यंत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहिले. (Photo: Getty Images)