
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरू आहे. इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज असून चार विकेट हातात आहेत. पावसामुळे चौथ्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने एकूण मालिकेत चांगली कामगिरी केली. असं असताना मोहम्मद सिराजबाबत स्टूअर्ट ब्रॉडने एक खुलासा केला आहे. (Photo- BCCI)

भारतात मोहम्मद सिराजला मियां भाई आणि डीएसपी सिराज नावाने संबोधलं जातं. पण इंग्लंडचा संघ मोहम्मद सिराजला भलत्याच नावाने संबोधते. स्टूअर्ट ब्रॉडने हा खुलास केल्यानंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Photo- BCCI)

इंग्लंडचा संघ मोहम्मद सिराजला मिस्टर अँग्री या नावाने संबोधते. मोहम्मद सिराजचा मैदानाती उत्साह काही भलताच असतो. विकेट घेतल्यानंतर त्याची प्रतिक्रिया एकदम आक्रमक असते. त्यामुळे इंग्लंडचा संघ त्याला मिस्टर अँग्री संबोधते. (Photo- BCCI)

सिराजने या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली असून 9 डावात 18 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने सहा विकेट घेतल्या होत्या. तसेच ओव्हलमध्ये पहिल्या डावात 4 विकेट घेतल्या. (Photo- BCCI)

सिराजने इंग्लंडविरुद्धच्या पाचही सामन्यात गोलंदाजी केली. त्यामुळे त्याच्या वर्कलोड व्यवस्थापनाची चर्चा होत आहे. सिराजने सांगितलं होतं की, देशासाठी एकही सामना चुकवू इच्छित नाही. (Photo- BCCI)