T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून रोहित शर्माचा विक्रम मोडला, झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. असं असातना सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात कर्णधार म्हणून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

| Updated on: Feb 16, 2026 | 4:14 PM
1 / 5
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील सलग तीन सामने जिंकले असून सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. 15 फेब्रुवारीला झालेला पाकिस्तानविरुद्धचा सामनाही एकतर्फी जिंकला. या विजयासह कर्णधार सूर्यकुमार यादव टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर 1 भारतीय कर्णधार ठरला आहे.  (Photo- PTI)

2 / 5
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा 37वा विजय होता. यासह त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला आहे. सूर्यकुमार यादव पहिल्या 46 टी20 सामन्यात सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.  (Photo- PTI)

3 / 5
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने पहिल्या 46 समन्यात 37 सामने जिंकले आहेत. तर सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. रोहित शर्माने पहिल्या 46 सामन्यापैकी 36 सामने जिंकले आणि 10 सामने गमावले आहेत.  (Photo- PTI)

4 / 5
विराट कोहलीने पहिल्या 46 सामन्यात कर्णधार म्हणून 29 सामने जिंकले आणि 15 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. महेंद्रसिंह धोनी 26 सामने जिंकले, तर 19 सामने गमावले आहेत. (Photo- PTI)

5 / 5
सूर्यकुमार यादवने विजयाचा विक्रम तर मोडला. पण रोहित शर्माचा आणखी विक्रमाचा कित्ता गिरण्यास सज्ज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला होता. आता सूर्यकुमारच्या नेतृत्वात विजय मिळावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. (Photo- PTI)