
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याने टी 20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. सूर्यकुमार यासह अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज टेम्बा बावुमा याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. तर मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

सूर्यकुमार यादव याने पंजाब विरूद्धच्या सामन्यात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 25 वी धाव पूर्ण केली. सूर्या यासह टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सलग 14 डावात 25 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. सूर्याने दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या गेल्या सामन्यात टेम्बा बावुमाच्या या विक्रमाची बरोबरी केली होती. (Photo Credit : Ipl/Bcci)

तसेच सूर्यकुमार आयपीएलच्या एका हंगामात सलग सर्वाधिक 14 वेळा 25 धावा करणारा फलंदाज ठरला. सूर्याने आयपीएलमध्ये शुबमन गिल आणि केन विलियमसन या दोघांना मागे टाकलं. केन (2018) आणि शुबमन (2023) या दोघांनी प्रत्येकी सलग 13 वेळा 25 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. (Photo Credit : Ipl/Bcci)

तसेच सूर्यकुमारने 36 धावा पूर्ण करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सूर्या यासह आयपीएलमध्ये मुंबईसाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. सचिनने 2010 साली 15 सामन्यांमध्ये 618 धावा केल्या होत्या. तर सूर्याने 14 सामन्यांतच ही कामगिरी करुन दाखवली. सूर्याने याआधी IPL 2023 मध्ये 600 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. (Photo Credit : Ipl/Bcci)