FIFA WC 2026: मित्राच्या बहिणीवर जडलं प्रेम! ज्या देशासाठी खेळायचं होतं त्या संघाविरुद्ध मारले गोल
फीफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आणि रंजक कथांची मालिका काही संपणार नाही. कारण दर वर्षांनी येणाऱ्या या स्पर्धेत काही अनोखं आणि विचित्र घडत असतं. असंच काहीसं स्वीडन ट्यूनीशिया सामन्यात घडलं. या सामन्यात यासीन अयारीने चमकदार कामगिरी केली. त्याची कथाही काही वेगळी आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वीडनने ट्यूनीशियाला 5-1 ने मात दिली. या विजयाचा मानकरी ठरला तो यासीन अयारी.. त्याने या सामन्यात दोन गोल मारले आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोन गोल मारूनही त्याने जल्लोष केला नाही. त्या मागे खास कारण होतं. कारण अयारीला ट्यूनीशियासाठी फूटबॉल खेळायचं हों. पण वडिलांना तसं करण्यास नकार दिला. (PC-GETTY IMAGES)

यासीनचा जन्म स्वीडनमध्ये झाला आणि त्याचे वडील ट्यूनीशियाला शिफ्ट झाले होते. 2021 मध्ये ट्यूनीशियाने संघाकडून यासीन अयारीला संघात खेळण्याची ऑफर मिळाली होती. पण वडिलांनी त्याला स्वीडनसाठी खेळण्यास भाग पाडलं. यासीनने वडिलांचं म्हणणं ऐकलं आणि फिफा वर्ल्डकप स्पर्धेत स्वीडनकडून उतरला. (PC-GETTY IMAGES)

अयारीने एस्टाडियो बीबीवीए स्टेडियममध्ये स्वीडनसाठी सातव्या मिनिटाला गोल मारला. यासह दुसऱ्या हाफमध्ये स्टॉपेज टाइममध्ये लांबून दुसरा गोल मारला आणि स्वीडनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. (PC-GETTY IMAGES)

यासीन अयारी इंग्लीश प्रीमियर लीग स्पर्धेत ब्रायटन क्लबसाठी खेळतो. या लीगमधून त्याला वर्षाला 5.28 कोटी रुपये मिळतात. (PC-GETTY IMAGES)

यासीन अयारीची प्रेमकहाणी भलतीच आहे. त्याला आपल्या मित्राची बहीण सँड्रा कुलुसेवेस्कावर प्रेम जडलं. सँड्रा टॉटेनहमचा फुटबॉलपटू डेजान कुलुसेवेस्काची बहीण आहे. रिपोर्टनुसार, यासीन लवकरच वडील होणार आहे. (PC-INSTAGRAM)