IND vs ENG, Semi Final: संजू सॅमसनचं इंग्लंडविरुद्ध झंझावाती अर्धशतक, नोंदवला असा विक्रम

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत संजू सॅमसनची बॅट पुन्हा एकदा तळपली. अभिषेक शर्माची विकेट झटपट पडल्यानंतरही संजूच्या फलंदाजीत काही बदल झाला नाही. त्याने झंझावाती अर्धशतक ठोकत संघाला सावरलं.

| Updated on: Mar 05, 2026 | 7:55 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यामुळे भारताला 200 पार धावा करणं भाग आहे. कारण वानखेडेचं स्टेडियम छोटं आहे. त्या दृष्टीने संजू सॅमसनने फलंदाजी केली. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यामुळे भारताला 200 पार धावा करणं भाग आहे. कारण वानखेडेचं स्टेडियम छोटं आहे. त्या दृष्टीने संजू सॅमसनने फलंदाजी केली. (Photo- BCCI Twitter)

2 / 5

टीम इंडियाच्या 20 धावा असताना अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. अभिषेक शर्मा 7 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. (Photo- BCCI Twitter)

3 / 5

संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 200 चा होता. यानंतरही संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं. (Photo- BCCI Twitter)

4 / 5

संजू सॅमसनच्या खेळीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण जाताना दिसत आहे. संजू सॅमसन या स्पर्धेपूर्वी फॉर्मात नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्लेइंग 11 मध्ये त्याचा विचार केला गेला नाही. पण सुपर 8 च्या झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यानंतर प्लेइंग 11 चा भाग आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 5

संजू सॅमसनने दुसऱ्या विकेटसाठी इशान किशनसोबत 45 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. टी20 वर्ल्डकप 2007 च्या डर्बन येथील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यातील 6.3 षटकांत 84 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर ही टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीत भारताची सर्वोच्च भागीदारी आहे. (Photo- BCCI Twitter)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us