Team India : गंभीरच्या खास माणसाला टीम इंडियात संधी, विराट कोहलीपेक्षा सरस कामगिरी

क्रिकेटच्या मैदानात विश्वास जिंकणाऱ्या खेळाडूंना गौतम गंभीर कधी न कधी संधी देतो, हे आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालं आहे. गंभीरने अशाच एका विदेशी खेळाडूवरही विश्वास दाखवला. त्यामुळे तो खेळाडू आज टीम इंडियात गंभीरसह आहे.

| Updated on: Jun 30, 2025 | 6:52 PM
1 / 5
विश्वास बसला की टीममध्ये घेतला , हे वाक्य टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याच्यासाठी तंतोतंत लागू पडतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गौतम गंभीरने आयपीएल आणि भारतीय संघात त्याच्या विश्वासातील खेळाडूंना संधी दिली आहे. गंभीरने अशाच एका अनुभवी खेळाडूला भारतीय संघात संधी दिली. रायन टेन डेश्काटे असं या दिग्गजाचं नाव आहे. (Photo: PTI)

2 / 5
नेदरलँडचा माजी फलंदाज आणि कर्णधार रायन टेन डेश्काटे आज 30 जून रोजी 45 वर्षांचा झाला आहे. डेश्काटे टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. डेश्काटे भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहे. डेशकाटे याने खेळाडू म्हणून खेळताना आपला वेगळा ठसा उमटवला होता. (Photo: Getty Images)

3 / 5
डेश्काटेची आजही नेदरलँड्सच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. डेश्काटने 33 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतकं आणि 9 अर्धशतकांसह 1 हजार 541 धावा केल्या आहेत.तसेच डेश्काटेने 55 विकेट्सही घेतल्या आहेत. डेश्काटने 24 टी 20i सामन्यांमध्ये 533 धावा करण्यासह 13 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo: Getty Images)

4 / 5
डेश्काटे 33 एकदिवसीय सामने खेळला. मात्र डेशकाटेची या दरम्यान सरासरी ही टीम इंडियाच्या विराट कोहली याच्यापेक्षाही सरस राहिलीय. डेश्काटेने 67 च्या सरासरीने 1 हजार 541 धावा केल्या, जी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक आहे.  तर विराटची सरासरी 57.88 अशी आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
डेश्काटे आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. डेश्काटने गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. तिथेच डेश्काटने गंभीरचा विश्वास जिंकला. त्यानंतर गंभीरने डेश्काटला टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये आणण्यात निर्णायक भूमिका बजावली (Photo: PTI)